Schezwan Potato – शेजवान पोटॅटो

बटाटे कोणाला आवडत नाहीत? बटाटे आपण ह्या ना  त्या रूपात खात असतो. बटाट्याची भाजी, भजी, कोणत्याही भाजीत जोडीला बटाटा असतोच. मग ह्याच बटाट्यात थोडेसे चायनीज फ्लेवर टाकले तर?

नेहमीच्या बटाट्याला चायनीज बटाटा बनवून मुलांना खाऊ घाला. मुले बाहेरचे खाणे विसरून घरीच खायचा हट्ट करतील. हायजिनक पण आणि चांगले पण. 

चला तर मग सोपी शेजवान पोटॅटोची कृती बघूया. 

लागणारा वेळ : ३० – ४० मिनिटे 
जणांसाठी :

साहित्य :

 • ३ मध्यम बटाटे
 • २ टिस्पून तीळ
 • २ टिस्पून शेंगदाणे
 • १/२ टिस्पून जिरे
 • १/२ टिस्पून व्हिनेगर
 • १/४  टिस्पून सोयासॉस
 • १  टिस्पून  शेजवान सॉस
 • ४ टिस्पून तेल
 • १/२ टिस्पून लाल तिखट
 • २ लाल मिरच्या
 • मीठ, चवीनुसार
 • १ टिस्पून कांद्याची हिरवी पात सजावटीसाठी

कृती :

१. बटाटे शिजवून सोलून घेऊन त्याचे उभे तुकडे करून घ्यावे.
२. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बटाट्याचे तुकडे घालून परतावे.
३. बटाटे ब्राऊन रंगाचे होईपर्यंत शॅलो फ्राय करू घ्यावेत. 
४. बटाटे शॅलो फ्राय करून झाले कि टिशू पेपर वर काढून ठेवावे.
५. बटाटे गरम असतानाच  यावर मीठ आणि लाल  तिखट घालून हाताने चांगले मिक्स करावे.
६. दुसऱ्या भांड्यात तेल घेऊन मध्यम आचेवर शेंगदाणे तळून  घ्यावेत.
७. शेंगदाणे टिशू पेपर वर काढून घेऊन त्याच तेलात जिरे आणि  तीळ घालावेत.
८. तीळ थोडे गुलाबी रंगाचे झाले कि लगेच त्यात लाल मिरच्या आणि फ्राय केलेले बटाटे घालून चांगले मिक्स करावे. फ्राय केलेले शेंगदाणे देखील टाकावेत. 
९. नंतर वरील मिश्रणात शेजवान सॉस, सोयासॉस, व्हिनेगर घालून मिक्स करावे.
१०. गॅस बंद करावा.
११. सजावटीसाठी  कांद्याची हिरवी पात बारीक चिरून घालावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत