Cheese Masala Papad – चिज मसाला पापड

बटर मध्ये भाजलेला, वरून टोमॅटो-कांद्याचे चटपटीत मिश्रण लावलेला आणि मस्तपैकी चीज पसरवलेला असा चीज मसाला पापड जेवणाच्या आधी खायला मिळाला तर? नाही, नाही – हॉटेल मध्ये नाही, घरात बनवून! 

घरात सुद्धा आपण चीज मसाला पापड बनवू शकतो तेही अगदी कमी वेळात. वरून पसरवले चीज पापडाला एक वेगळीच चव देऊन जाते. 

चला बघूया चीज मसाला पापड कसा बनवायचा. 

लागणारा वेळ : १५ मिनिटे

साहित्य:

  • २ उडदाचे मोठे पापड
  • १ कांदा, बारीक चिरून
  • १ टोमॅटो, बारीक चिरून
  • २ चमचे कोथिंबीर ,बारीक चिरून
  • १/४ चमचा लाल तिखट
  • मीठ, चवीनुसार
  • चाट मसाला, चिमुटभर
  • १/४ चमचा थेंब लिंबाचा रस
  • बारीक शेव किंवा चिजचा किस (सजवण्या करीता )
  • बटर

कृती :

१. एका पॅन मध्ये बटर टाकून त्यावर पापड हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. 
२. एका वाटीत चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घ्यावे. त्यात लाल तिखट, मीठ, लिंबू रस, चाट मसाला, जिरे पावडर घालून नीट मिक्स करावे. 
३. वरील मिश्रण भाजलेल्या पापडावर घालावे.
४. त्यानंतर त्यावर बारीक शेव आणि  चिजचा किस एक समान पसरवा.
५. चीज मसाला पापड तयार !

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत