Moong Dal Bhaji – मूगडाळीची भजी

कुरकुरीत, खमंग मूगडाळीची भजी, ह्या थंडीच्या दिवसात खाऊन झाली की नाही ? नसतील तर ही रेसिपी करून बघा. अतिशय सोपी, चटकदार, कमी वेळात होणारी भजी नक्की करून बघा.

Read Moong Dal Bhaji in English

लागणारा  वेळ: ३० मिनिटे

जणांसाठी: ५ – ६

साहित्य :

  • १/२ कप  मुगाची डाळ
  • १/४ कप तांदूळ
  • २/३ हिरव्या मिरच्या
  • १/४ कप चिरलेली कोथिंबीर
  • १/२ कप चिरलेला कांदा
  • १ टिस्पून लसूण पेस्ट
  • १/२ टिस्पून  हळद
  • १/२ टीस्पून जिरे
  • तळण्यासाठी  तेल
  • चवीनुसार  मीठ
कृती :

१. प्रथम मुग डाळ व तांदूळ २-३ तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे.

२. एका मिक्सरच्या भांड्यात डाळ ,तांदूळ आणि हिरव्या  मिरच्या घेवून जाडसर वाटून घ्या

३. वरील मिश्रणात कोथिंबीर , लसूण पेस्ट, जिरे , हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून  घ्यावे .

४. कढईत तेल तापत ठेवावे.

५. दुसरीकडे मिश्रणाचे छोटे- छोटे  गोळे करून  तेलात सोडावे .

५. गोल्डन ब्राऊन रंग आला कि  टिशू पेपर वर काढून घ्या.

६. गरम गरम भजी हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस  बरोबर सर्व्ह  करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत