Veg Soya Cutlet – व्हेज सोया कटलेट

सोयाबीन पासून बनलेला हेल्थी, टेस्टी असा नाश्ता किंवा चहाबरोबर खायलाही अति-उत्तम. सोया पावडर हा सोया कटलेट मधील महत्वाचा घटक आहे. चला तर मग सोया कटलेट कसे बनवतात ते बघूया !

जणांसाठी : २ ते ३
लागणारा  वेळ: ३० मिनिटे

साहित्य :

 • १ वाटी मटारचे दाणे
 • १ वाटी गाजर, बारीक चिरून
 • १ वाटी कोबी, बारीक चिरून
 • १ वाटी सिमला मिरची ,बारीक चिरून
 • २ उकडलेले बटाटे
 • ३ चमचे लसूण , हिरवी मिरची यांची पेस्ट
 • १ वाटी सोया बॉल्स
 • १ चमचा लिंबू रस 
 • १ चमचा मिरी पावडर
 • १ चमचा जिरे पावडर
 • तेल
 • चवीनुसार मीठ

कृती :

१. प्रथम उकडलेले बटाटे साले काढून, कुस्करून घ्यावेत.
२. कढईत २ चमचे तेल टाकून त्यावर वरील भाज्या चांगल्या वाफवून घ्याव्या.
३. वाफवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्या कि हाताने कुस्करून घ्याव्यात .
४. वरील भाजीत कुस्करलेले बटाटे, लसूण-मिरची पेस्ट, लिंबू रस,मिरी पावडर,जिरे पावडर  आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
५. सोया बॉल्स मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून एका बाजूला ठेवून दया.
६. वरील मिश्रणाचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे कटलेट बनवावेत.
७. सोया बॉल्सच्या पावडर मध्ये प्रत्येक कटलेट बुडवून कटलेटच्या सगळ्या बाजूला पावडर लागेल, असे घोळवून घ्या.
८.कढईत  तेल गरम करून कटलेट तळून घ्यावे.
९. तेलकट नको असतील तर नॉनस्टिक तव्यावर तेल किंवा बटर सोडून कुरकुरीत होईपर्यंत ठेवावे.
१०. सॉस व पुदिना चटणीसोबत सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत