Apple Roti – सफरचंदाची पोळी

तुमची मुले जर फळे विशेष करून सफरचंद खायला कंटाळा करत असतील तर त्यांच्यासाठी सफरचंदाची पोळी ही एक अतिशय सुंदर अशी रेसिपी देत आहे. 

सोपी आणि सुटसुटीत. आपण नेहमी पराठा करतो तसेच करायचे फक्त पोळीच्या आत सफरचंदाचे सारण भरायचे. आहे कि नाही सोपी. चला तर मग बघूया सफरचंदची पोळी कशी करतात. 

लागणारा  वेळ : ४० – ५० मिनिटे
जणांसाठी :२ ते ३

साहित्य :

सारण 

  • १ वाटी सफरचंदाचा किस 
  • १/४ वाटी साखर 
  • १/२ वाटी दूध 
  • १ चमचा वेलची पावडर 
  • १ चमचा तूप
  • दूध पावडर  

पारीसाठी :

  • १ वाटी कणिक 
  • १ चमचा बेसन 
  • १ १/२ चमचा तांदूळ पिठी 
  • १ १/२ चमचा तेल 

कृती:

१ . कणकेत तांदूळ पिठी, बेसन, मीठ आणि तेल घालून एकत्र भिजवून घ्या. 
२. ते एका बाजूला झाकून ठेवा. 
३. कढईत तूप घालून त्यात किसलेलं सफरचंद घालून दोन मिनिटे चांगले परतून घ्या. 
५. आता त्यात दूध,साखर,घालून ढवळत रहा. 
६. घट्ट होऊ लागलं कि दूध पावडर आणि वेलची पावडर घालावी.
७. गॅस बंद करून ते थंड होऊ दया.
८. वरील मिश्रण थोडं मऊ असावे. घट्ट वाटले तर दुधाच्या हाताने मळून घ्या.
९. कणकेचा छोटा गोळा घेऊन, मधून खोलगट करून त्यामध्ये सफरचंदाचे सारण भरा.
१०. सुकं  पीठ घेऊन पराठ्या सारखे लाटा .
११. तव्यावर दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या.
१२. तुपाची धार सोडून गरम – गरम खायला द्या.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत