Basic Sponge Cake – बेसिक स्पॉंज केक

कोणताही केक करायचा असेल तर सर्वात आधी स्पॉंज केक करून घ्यावा लागतो, हे तर सगळ्यांना माहित असेलच. तयार स्पॉंज केक बेस म्हणून वापरून, वरून कोणतेही फ्रॉस्टिंग करता येते. 

स्पॉंज केक मध्ये नुसते जॅम फिलिंग किंवा व्हिप्ड क्रीम फिलिंग करता येते. हा केक एकतर अंड्याचा किंवा बिना-अंड्याचा बनवू शकतो. 

तर बेसिक स्पॉंज केक घरच्या घरी कसा बनवायचा ते बघू. 

पूर्वतयारी : २५ ते ३० मिनीटे 
बेकिंगसाठी : ३५ ते ४० मिनीटे

साहित्य :

  • १ १/२  कप मैदा 
  • १०० ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क 
  • ५० ग्रॅम बटर 
  • १ टिस्पून बेकिंग पावडर
  • १/२ टिस्पून बेकिंग सोडा
  • १/२ टिस्पून व्हॅनिला इसेंस
  • १/२ कप प्यायचा सोडा 
  • १ टिस्पून  पिठी साखर 

कृती :

१. एका भांडयात मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून नीट चाळून घ्यावे. 
२. दुसऱ्या भांड्यात कंडेन्स्ड मिल्क आणि बटर हॅन्ड बीटरने चांगले फेटून घ्या. 
३. त्यामध्ये पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेंस घालून चांगले मिक्स करा. 
४. वरील मिश्रणात प्यायचा सोडा टाकून मिक्स करा. 
५. आता थोडे-थोडे मैद्याचे मिश्रण टाकून फेटून घ्या. 
६. मिश्रण एकदम पातळ पण नसावे आणि घट्ट पण नसावे. 
७. केकच्या भांड्याला आतून तुपाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण ओतावे. 
८. कुकरची शिट्टी आणि रिंग काढून कुकर मोठ्या आचेवर १० मिनिटे प्रीहीट करून घ्यावा.
९. त्यामध्ये केकच भांडे ठेवून २० ते २५ मिनिटे मंद आचेवर होऊन द्यावा. 
१०. २५ मिनिटांनी केक मध्ये टूथपिक टाकून केक झाला कि नाही ते बघावे.
११. जर टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक झाला असे समजावे.

आपले आवडते क्रीम लावून केक फ्रिज मध्ये सेट व्हायला ठेवा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत