Egg Fritters

पावसात आपण नेहमी गरमा-गरम कांदा-बटाटा भजी खातो. या वेळी जराशी वेगळी पण अतिशय चविष्ट अशी अंडा-भजी करून बघा.

Read Egg Fritters In English

जणांसाठी –
लागणारा वेळ – २० मिनिटे

साहित्य :

  • अंडी – ४
  • कांदा – १/४ कप बारीक चिरून
  • सोया सॉस
  • मैदा – २ चमचे
  • हळद – १/४ चमचे
  • कॉर्न फ्लोअर – २ चमचे
  • पाणी, मीठ,तिखट – गरजेनुसार
  • तेल – तळण्यासाठी

कृती:

१. अंडी उकडून घ्या.
२. एका भांड्यात कांदा, सोया सॉस, मैदा, हळद, कॉर्न फ्लोअर, मीठ,तिखट एकत्र घेऊन, त्यात थोडे-थोडे पाणी  घालत भजी सारखे पातळ पीठ करावे.
३. उकडलेल्या अंड्याचे दोन भाग करावेत.
४. कढईत तेल गरम करत ठेवावे.
५. आता प्रत्येक भाग तयार पिठात बुडवून तेलात डीप-फ्राय करावा.
६. गरम-गरम अंडा भजी टोमाटो सॉस बरोबर खायला द्या.

Leave a Reply